Tuesday, October 04, 2005

पटेल पाँईंट


अमेरीकेत काही जागा आहेत ज्यांना पटेल पाँईंट असे म्हणतात. नायगराचा धबधबा, न्यूयाँर्कची स्वातंत्र्यदेवी, वाँलस्ट्रीटवरचा बैल, गोल्डनगेट पूल, डीस्ने पार्क, शिकागो लूप, सियर्स टाँवर, लासवेगास इत्यादी...

ह्या ठिकाणी उभे राहून जर तुम्ही स्वत:चे फोटो काढून घेतले नाहीत तर भारतातील तुमच्या नातलगांची, मित्रमंडळींची खात्री "पटत" नाही की तुम्ही अमेरीकेत आला आहात. त्यामूळे ह्या पाँईंटवर हजारो भारतीय दिसतात.

पटेल पाँईंटची अजुन एक व्याख्या आहे, काहीशी अनआँफ़ीशियल....ज्या ठिकाणी सर्वात जास्त "पटेल" मंड्ळी दिसतात तो पटेल पाँईंट.

अश्याच एका पटेल पाँईंटचा हा फ़ॊटॊ. आमचा मित्र अरविंद क्लीव्हलंडला आला होता तेंव्हा त्याला घेउन नायगरयाला गेलो होतो. धबधबयाच्या अगदी जवळ जाउन

त्याचा "एक्स्लुझीव्ह" फ़ॊटॊ काढायचा होता पण जागाच मिळत नव्हती. सारसबाग, गेटवे आँफ़ इंडीया, व्रुंदावन गार्डन इथे असावी अशी गर्दी होती. शेवटी एक फ़ॊटो काढला पण तो अमेरीकेत काढला आहे असे कोणाला सांगुनही खरं वाटणार नाही.