Sunday, March 19, 2006

परीक्षा ज्वर

वसंत ऋतुचे अागमन ही एक पर्वणी असते. मोगरा फुलतो, पेरूला फुले येतात, गुलमोहोर फुलु लागतो आणि सर्वात महत्त्वाचे की कोळीळ गाउ लागतात. भारतातील मार्च महीना हा परीक्षा ज्वराने भारलेला असला तरीही मला हया ऋतुचक्रातील नितांत मोहक टप्प्याने वेड लागायचे.

अमेरीकेतील वसंत ऋतु तर अजुनच मोहक असतो. चार महीन्याच्या कडक थंडीनंतर सूर्याचे नियमीत दर्शन होउ लागते. दिवस मोठा वाटायला लागतो. पर्णहीन व्रुक्षांना पालवी फुटु लागते, जमीनीतुन लिली सारख्या कंदाचे धुमारे उसळुन बाहेर येतात आणि पक्षांचा किलबिलाट जाणवु लागतो. आसमंतात एक सुगंध पसरतो.

आणि ...........कुठेही परीक्षा ज्वर नसतो........