Tuesday, June 13, 2006

ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षणा पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंदांच्या 'कास्ट, कल्चर अँड सोशलिझम' या पुस्तकातील 'आय अॅम अ सोशलिस्ट' या लेखाचा हा स्वैर भावानुवाद डोळ्यांत अंजन घालणारा ठरावा. अनुवाद: प्रतिमा जोशी

भारतात आजवर पौरोहित्य करणाऱ्या वर्गात ज्ञानाचे केंदीकरण झाले तर या पृथ्वीतलावरील सत्ता आपल्या हातीच एकवटलेली राहील याची काळजी क्षत्रियांनी घेतली. मनुष्यजातीच्या प्रारंभीच्या काळात या दोन वर्णांची उपयुक्तता होती. पण पुढचा अनुभव असा की, आपण प्रजेच्या हिताचे विश्वस्त आहोत याचा पूर्ण विसर पडून सर्व साधने व सत्ताकेंदे आपल्या हाती असावीत व त्याची अधिकाधिक फळे आपल्यालाच मिळावीत, असाच प्रयत्न राजे लोकांनी केला. आपणाशिवाय अन्य सारे तुच्छ असून कोणत्याही प्रकारचा विरोध हे पापकृत्य असल्याचा दंडक त्यांनी घालून दिला. संरक्षणाऐवजी दमन, जतनाऐवजी शोषण अशी वैशिष्ट्ये मिरवणाऱ्या राजसत्ता एखाद्या संग्रहालयातील वस्तू बनून राहिल्या तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही.

सत्तेच्या या गुमीर्ला वाकविण्याची ताकद संपत्तीत असते. आथिर्क नाड्या हाती असलेल्या धनाढ्य वर्गापुढे राजाही नतमस्तक होतो तिथे इतरांचे काय? वैश्यांची ताकद नाण्यांच्या छनछनाटात असते. ज्ञानाचा मक्ता असलेला ब्राह्माण आणि शस्त्रबळावर राज्य करणारा क्षत्रिय हे आपल्याला शिरजोर होऊ नयेत, अशा विचाराच्या वैश्यांची संख्या कितीही असली तरी मेंदू मात्र एकच असतो. आपल्या संपत्तीच्या मार्गात राजसत्ता आडवी येऊ नये, यासाठी जातीचा बनिया फार जागरूक असतो. पण त्याच वेळी सत्ता राजाच्या हातून निघून शूदाहाती जावी, असे मात्र त्याला चुकूनही वाटत नसते.

आणि ब्राह्माणांचा प्रभाव, क्षत्रियांची ताकद आणि वैश्यांचे भाग्य ज्यांच्या श्ामामुळे एकवटून राहते ते कुठे आहेत? कोणत्याही काळात, कोणत्याही देशांत कणा बनून राहण्याचे कर्तव्य ज्यांच्या वाट्याला येते अशा शूदांचा इतिहास काय सांगतो? दहा माणसांमध्ये लाखोंची ताकद असणारी एकजूट त्यांच्यापासून अद्याप मैलोगणती दूर आहे. साहजिकच निसर्गाच्या नियमानुसार शूदांचे दमन होत राहते.

पण असाही काळ येईल, जेव्हा शूद त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी उठाव करतील. आज वैश्यांची आणि क्षत्रियांची वैशिष्ट्ये अंगी बाणवून ते जसा स्वत:चा उत्कर्ष करू मागताहेत तशा प्रकारे नव्हे, तर स्वत:ची जन्मजात वैशिष्ट्ये कायम बाळगून क्षत्रिय नि वैश्यांचा अर्क न बनता शूद म्हणूनच हा वर्ग सवोर्च्चता प्राप्त करेल. आज त्यांची अवस्था जनावरापेक्षाही दयनीय असली तरी शूद सामाजिक क्रांतीचे वाहक बनणार आहेत.

शूदांची लायकी त्यांच्या चांगल्या वा वाईट गुणांवर नाही तर जन्मावर आधारित आहे. भारतातील या जातिव्यवस्थेत शूद नेहमीच तळाशी गाडले गेले. सर्वप्रथम शूदांना संपत्तीचा अधिकार नाकारला गेला, मग ज्ञानार्जनाचा आणि विद्येचा अधिकार नाकारला गेला. एखाद्या शूदवणीर्याने अद्वितीय गुण प्रकट केलेच, तर त्याला एकट्यालाच आपल्या सीमित वर्तुळात खेचून सामावून घ्यायचे, त्याच्या माणसांपासून त्याला अलगद एकटे पाडायचे आणि आपला प्रभाव टिकून राहण्यासाठी त्याच्या गुणांचा वापर करून घ्यायचा, अशी खेळी खेळली गेली.

ज्यांचा जन्म कोणत्या वर्णात झाला याबद्दल शंका आहेत अशी वशिष्ठ, नारद, सत्यकाम जाबाल, व्यास, कृप, दोण, कर्ण आणि बाकी उदाहरणे पाहिली, तर त्यांच्या अफाट विद्वत्तेमुळे त्यांना ब्राह्माणांचा वा क्षत्रियांचा दर्जा दिला गेलेला दिसतो; पण त्यामुळे शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया, नोकर, मच्छिमार किंवा सारथ्यकाम करणाऱ्यांचा काहीही फायदा झालेला दिसत नाही. तर दुसरीकडे ब्राह्माण, क्षत्रिय नि वैश्यांमधील अध:पतीत व्यक्तींना शूदांमध्ये गणले गेलेले दिसते.

आधुनिक भारतात शूद कितीही धनिक अथवा विद्वान कुटुंबात जन्मला असला तरी त्याला आपला स्वत:चा समूह सोडण्याची अनुमती नाही. या जातिबद्ध समाजरचनेमुळे व्यक्ती कितीही शिकली आणि प्रगत झाली तरी ती विशिष्ट वर्तुळातच सीमित राहते. जातीपलीकडे जाऊन व्यक्तीचे मूल्य जोपर्यंत मोजले जाणार नाही, तोपर्यंत बदलाची ही प्रक्रिया चालू राहील. या प्रक्रियेत शेवटी श्ामिक शूदांची सत्ता प्रस्थापित होईल. आजपर्यंत पहिल्या तीन वर्णांनी सत्ता चाखली. आता पाळी शूदांची आहे. कोणीही हे थांबवू शकणार नाही. समाजवाद ही परिपूर्ण व्यवस्था आहे म्हणून मी समाजवादी नाही, तर भाकरीच न मिळण्यापेक्षा अधीर् भाकरीही बरी असे मला वाटते.

जर मजुरांनी काम करायचे थांबवले तर तुम्हाला मिळणारे अन्न आणि तुम्ही परिधान करत असलेली वस्त्रे यांचे उत्पादनच थांबेल... आणि तरीही स्वत:च्या संस्कृतीच्या बाता मारत या लोकांना 'खालच्या' वर्गातले म्हटले जाते! जगण्याच्या झगड्यात विद्या संपादन करून जागृत होण्याची संधीच त्यांना मिळालेली नाही. त्यांनी वर्षानुवषेर् यंत्रवत कामच केले आणि आपल्या बुद्धिकौशल्याच्या बळावर विशिष्ट लोकांनी या कामाची फळे चाखली, पण आता काळ बदललाय. आपले न्याय्य हक्क या कष्टकरी वर्गाला समजले आहेत आणि ते मिळवण्याचा निर्धारही त्यांच्यापाशी आहे. आता कितीही प्रयत्न केले तरी उच्च जातीचे लोक 'खालच्या' जातीच्या लोकांचे दमन करू शकणार नाहीत. खरे तर या मागास राहिलेल्या लोकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यातच तथाकथित उच्चवणीर्यांचे हित आहे.

जेव्हा ही बहुसंख्या पूर्णपणे जागी होईल तेव्हा आपले कसे शोषण झाले आहे, ते त्यांना कळून चुकेल आणि त्यांच्या नुसत्या फुंकरीने 'उच्च' लोक फेकले जातील. समाजाची संस्कृती याच बहुसंख्येने घडवली आहे आणि उद्या हीच बहुसंख्या तिला खाली खेचू लागेल. रोमन साम्राज्याचा अंत कसा झाला होता ते आठवून पाहा! म्हणूनच मी सांगतो की, धुळीत पडलेल्या या वर्गाला ज्ञान आणि संस्कृतीत भागीदारी देऊन त्यांच्या उन्नतीच्या वाटा मोकळ्या करून द्या. उच्चवणीर्यांच्या या चांगल्या कृतीबाबत ते कृतज्ञच राहतील.

गावोगावच्या कष्टकरी बहुजन बांधवांना जागे करण्याचे कर्तव्य पार पाडायला हवे. हिंदू धर्म ही ब्राह्माणांची मक्तेदारी बनली आहे, त्यामुळे ते हे काम करतील ही आशा सोडून शहाण्या लोकांनी हे करायला हवे. या धर्मावर ब्राह्माणांइतकाच सर्वांचा अधिकार आहे, हे प्रस्थापित करायला हवे. जीवनातील गरजा आणि शेती, व्यापार यांच्याबद्दल या बहुजनांना ज्ञान द्या... जर हे आपण करू शकत नसू तर तुमचे शिक्षण व्यर्थ आहे आणि तुमचे वेद नि वेदान्तही फुकाचा आहे.

भूतकाळाचे गोडवे गाणाऱ्या उच्चवणीर्यांना मी सांगू इच्छितो... तुमच्यातल्या बहुतेकांना आपले आर्यत्व आणि आपल्या उच्चवर्णात झालेल्या जन्माचा गर्व आहे. भारतातल्या उच्चवणीर्यांनो, तुम्हाला काय वाटते की, तुम्ही जिवंत आहात? तुम्ही तर दहा हजार वर्षांची जिवंत थडगी आहात... तुमचे अस्तित्व आता विलीन होऊ द्यात... एक नवी भारतमाता उदयास येऊ देत... शेतकऱ्याच्या नांगरातून.. मच्छिमारांच्या झोपड्यांतून.. गटई कामगारांच्या हत्यारांतून.. सफाईकाम करणाऱ्यांच्या झाडूतून... किराणा दुकानातून... कारखान्यांतून... रानावनातून.. दऱ्याखोऱ्यांतून! तुमच्या भाकरीतली अधीर् त्यांना द्या, आणि पाहा, तोंडातून 'ब्र'ही न काढता मूठभर धान्यावर कष्टाचे डोंगर उपसणाऱ्या त्यांच्यातल्या प्रचंड ऊजेर्ला सामावून घेण्यास हे विश्वही अपुरे पडेल.

Thursday, June 08, 2006

वाघीणीचे दुध

बरयाच दिवसांनी लिहितोय. अाताशा प्रवास कमी झालाय. अॅारेंज कौंटी, कॅलीफोर्निया येथे स्थिरावलो आहे. एका सर्वाथाने अांतरराष्ट्रीय कंपनीत काम करतोय. बॅास ब्रिटीश वंशाचा दक्षीण आफ्रीकी, सहयोगी कंबोडीयन, ब्राझीली, ब्रिटीश, जर्मन, व्हिएतनामी, इराणी, तुर्की, मेक्सीकन, चिनी, जपानी, कोलंबियन आणिक थोडेसे अमेरिकन......

इंग्रजी भाषेची चिरफाड हा सार्वत्रीक अनुभव... माझे इंग्रजी यथातथाच....व्याकरणाच्या चुका होतातच. आज मला काही वरीष्ठ आधिकारयांना इमेल लिहायचा होता. वाक्य होते....Please let me know to whom the access of the new transaction should be granted. वाक्यात काही तरी चुक आहे असे माझा वर्ड प्रोसेसर दाखवू लागला. मी तरखडकरांचा धावा केला, पण मला चुक सापडेना.

मी जॅानला, जो कंबोडीयन अाहे त्याला विचारले. त्याने खांदे उडवले. Please send me the list of people who will use this transaction. असे लिही असे सुचवले. मला पटले नाही. मग आम्ही अॅनाला विचारले, ती ब्राझीली अाहे. इंग्रजी तिचीही मात्रुभाषा नाही. तिला हे वाक्य ब्रिटीश धाटणीचे वाटले. तिने Kindly send me the list of authorized person(s) for this new transaction. असे सुटसुटीत रुपांतर सुचवले. मग आम्ही सगळे बॅास कडे गेलो. त्याने माझ्या वाक्याला पसंती दिली. संध्याकाळचे पाच वाजून गेले असल्याने तो निवांत होता. "माझ्या इंग्रजीवर आफ्रीकानचा प्रभाव अाहे, अापण एली ला विचारु. एली लिव्हरपूल इंग्लंड ची अाहे. ती माझे वाक्य पाहून म्हणाली की " अतीशय सुंदर, अश्याप्रकारचे इंग्रजी वाचून राणी खुश होइल." तिने मात्र Kindly let me know to whom the access of the new transaction should be granted. असे सुचवले.

मी पुरा वैतागलो, शेवटी तुकाराम बुवांनी सांगीतल्याप्रमाणे....ऐकावे जनाचे करावे मनाचे.... मी माझे वाक्य लिहीले.

अाणी हो माझा वर्ड प्रोसेसर चुक दाखवत होता कारण त्याच्या व्याकरणाची कळ अमेरीकन इंग्रजीवर झुकली होती.