Thursday, July 21, 2016

बॉन्साय

अनेक वर्षांपूर्वीं मला बॉन्साय बनण्याचा छंद जडला होता. जकरंड आणि बूचाच्या झाडांचे मी दौलदार बटू वृक्ष बनवले होते. मी त्यांना रोज पाणी द्यायचो, मुळे आणि फांद्या कापायचो. त्यांचं कुंड्यांमध्ये छोटेखानी दगड ठेवून त्यावर हिरवे शेवाळे किंवा मॉस वाढवायचो. पुण्यातील बोन्सॉय च्या प्रदर्शनात बक्षीस मिळवण्याची ईर्ष्या होती माझी. पण मी त्यावेळी आनंदी नव्हतो. जे करायची इच्छा होती ते जमत नव्हते, मिळत नव्हते. लहानपणी शिकलेली नारायणराव टिळकांची कविता सारखी आळवत होतो. "हे विश्व सारे विहारास माझ्या पुरेसे ना होईल शंका नको " आपण खूप काही करू शकतो पण कोणत्या तरी अदृश्य बंधनात अडकलो आहोत असा काहीतरी विचार सतत यायचा. अश्या गोंधळलेल्या विचाराच्या जळमटात अडकलेलो असताना एकदा त्या बोन्साय कडे लक्ष्य गेले आणि त्यांच्या बद्दल कवण वाटून गेली. एक अर्थाने त्यांची आणि माझी अवस्था फार वेगळी नाही असे जाणवले. घरासमोर दोन खड्डे खणले , कुंड्या फोडल्या आणि तो जकरंड आणि बूच खुल्या आकाशात आणि सर्वांना समाविष्ट करणाऱ्या धरणी मध्ये लावले. आणि मग कधीतरी पुढील कविता लिहिली.
आज ती झाडे सुमारे चाळीस फूट उंच झाली आहेत.
वसंत ऋतू मध्ये ती झाडे इतकी बहरतात की सगळा रस्ता पांढरा आणि जांभळा होतो. बुचाच्या फुलांचा घमघमाट पसरतो. आणि हो...कर्मधर्मसंयोगानी .. मीही आज आनंदी आहे.

Thursday, July 14, 2016

परमानंद


परमानंद

परमानंद  ही काय अध्यात्मिक उंची गाठलेल्या  व्यक्तींचीच  मक्तेदारी आहे काय

हा परमानंद लहान मुलांमध्ये कित्येकवेळा  दिसून येतो. काहीही  किंबहुना काहीच कारण नसताना  आनंदी राहणे  हे  फक्त लहान मुलांमध्ये  आणि अध्यात्मिक उंची गाठलेल्या माणसांमध्ये दिसून येते. अश्या मुलांना पाहिले की मग कळत कळत हेवा वाटायला लागतो.  स्व:ताच्या अप्रसन्नतेची लाज वाटून जाते

अश्या लज्जीतअसस्थेत टिपलेला हा फोटो... 



पुण्यात  भर उन्हाळ्यात ४४ डिग्री तापमान असताना उकडते आहे म्हणून उसासे ना टाकता, माझ्या  पुतण्याने आणि मुलाने काढलेला हा त्यावरील पर्याय. घरातील कमी प्रकाशातील  त्यांच्या वेगवान हालचालींमुळे  त्यांना स्पष्टपणे  टिपणे मला जमले नाही.  पण टिपला गेला तो त्यांचा उत्साह, प्रसन्नता, त्यांचा  परमानंद आणि चिदानंद 


Labels: , , ,