Wednesday, June 22, 2005

माय मराठी: शंतनु शाळिग्रामचे मराठी लिखाण

एन पी आर

२००३ च्या उन्ह्यळ्यात खूप कंटाळा आला होता म्हणून गाडीत सामान भरले आणी महामार्ग ९० वरुन पश्चीमेला निघालो. आठ दिवसात निरनीराळ्या गावी जाउन, मित्रांना भेटत मी सुमारे १६०० मैल प्रवास केला.

त्या आठ दिवसात मला एन.पी.आर. (NPR: National Public Radio http://www.npr.org/) अर्थात राष्ट्रीय लोक रेडीऒ ची चटक लागली. त्यानंतर माझ्या गाडीतील रेडीऒ नेहमीच एन.पी.आर.ला ट्युन असतो.एन.पी.आर.ची क्लीव्हलंड, शीकागो, न्यूयार्क, राली (उ. कॅरोलायना) ही स्टेशने मी नियमीतपणे ऐकली, ऐकतो.सर्वंकष आणि निरपेक्ष पत्रकरीता हे एन.पी.आर.चे ठळक वैशिठ्य आहे.
माझ्या गाडीत आताशा गाण्याच्या तबकड्या(सीडी) असत नाहीत. फ़क्त एन पी आर!

परवा ओटावा, कानडा येथे गेलो होतो, त्यावेळी एन पी आर चे भावंड असलेल्या सी.बी.एस.च्या कार्यालयात गेलो होतो.छान वाटले.

0 Comments:

Post a Comment

<< Home