Friday, April 13, 2018

मेदवेद

माझा नवा सहकारी युक्रेन चा राहणारा रशियन ज्यू आहे. तो भाषांचा प्रेमी आहे. त्याला ५ ते ६ भाषा येतात.
रशियन राजकारणावर बोलता बोलता माजी पंतप्रधान मेदवेदेव ह्यांचा विषय निघाला.
तो म्हणाला की मेदवेदेव ह्याचा अर्थ काय आहे माहीत आंहे का? अस्वल!
मेद म्हणणे मध आणि वेद म्हणजे जाणणारा! ज्याला मध कुठे आहे हे ज्याला माहीत असते ते.
हे ऐकून मी थक्क झालो.
संस्कृत मधील वेद हा शब्द विद पासून आला आहे आणि त्याचा अर्थ जाणणे असाच आहे. मध म्हणजे मधु.
अस्वलाला मधुज्ञ म्हणणे म्हणजे मेदवेद म्हणण्यासारखे आहे.
रशियन आणि भारतीय भाषांचे नाते ऐकून मी हरखून गेलो आणि विकिपीडियावर पाहू लागलो.
ref: https://en.wikipedia.org/wiki/Indo-European_languages
हा एक छान लेख बघा. त्यात रशियन आणि संस्कृत शब्दातील साम्य दाखवले आहे.
https://www.rbth.com/…/sanskrit_and_russian_ancient_kinship…
Medvedev (Russian: Медве́дев) and female Medvedeva (Медве́дева), from Russian medved' (медве́дь), meaning the animal "bear", are Slavic surnames. Notable bearers of the name include: Medvedev (male form)