Thursday, January 05, 2006

माझा मॅक

माझ्या बायकोने मला नुकताच अॅपलचा आयबुक जी ४ हा संगणक भेट दिला।

मी विंडोजच्या संगणकावर देवनागारीमध्ये बरहा वापरुन लिहू शकतो पण मॅकवर कसे लिहायचे माहीत नव्हते। त्यामुळे देवनागरीत लिहिणे थांबले होते।
पण मॅक अोएस एक्स १०.४ ह्या प्रणाली मध्ये देवनागरी लिपी समाविष्ट अाहे। मी कोणतेही नवे सॉफ्टवेअर न प्रस्थापित करता देवनागरीत लिहु शकतोय।

ह्यासंबंधी संशोधन करताना लक्षात आले आहे की नेपाळी भाषा जी देवनागरी वापरते ही संगणकाच्या वापारात आघाडीवर आहे। नेपाळी अोएस अस्तित्त्वात आहे। अनेक नेपाळी वार्तापत्रे युनीकोड आधारीत देवनागरी वापरतात।

मराट्ही अोएस आहे का? कोणी वापरली आहे का?

1 Comments:

Blogger सागर said...

मी गेल्या एक वर्षा पासुन iBook वापरतोय, मला तरी आजुन मरठी ऑफीस सापडले नाही...

anyway मॅक विश्वात तुझे स्वागत असो...

12:06 PM  

Post a Comment

<< Home